Maha Abhyas Logo

Maha Abhyas

तुमचं यश, आमचा अभ्यास 🎯

संधी (Sandhi)

संधी म्हणजे काय?
दोन शब्द किंवा अक्षरे एकत्र येताना त्यांच्या उच्चारात किंवा लेखनात बदल होतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन नवीन स्वरूप तयार होते. या वर्णांच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात.

उदाहरण: राम + आला = रामाला | देव + उपासना = देवोपासना

सारांश: संधी म्हणजे सांधणे, जोडणे.


संधीचे प्रकार

  • स्वर संधी
  • व्यंजन संधी
  • विसर्ग संधी

१. स्वर संधी

स्वर संधी म्हणजे काय?
एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास त्यास स्वर संधी म्हणतात. थोडक्यात: स्वर + स्वर = स्वर संधी

स्वर संधीचे प्रकार

१) सजातीय स्वर संधी / दीर्घत्व संधी
पोटशब्दस्वरसंधी
मुख्य + आलयअ + आमुख्यालय
अरुण + अचलअ + आअरुणाचल
वनिता + आश्रमआ + आवनिताश्रम
मुनि + इच्छाइ + इमुनीच्छा
गुरु + उपदेशउ + उगुरूपदेश
भू + उद्धारऊ + उभूद्धार
गिरि + ईशइ + ईगिरीश
जानकी + ईशई + ईजानकीश
२) गुणादेश स्वर संधी

अ/आ + इ/ई → ए

पोटशब्दसंयोगसंधी
यथा + इष्टआ + इयथेष्ट
ईश्वर + इच्छाअ + इईश्वरेच्छा
रमा + ईशआ + ईरमेश
चंद्र + ईशअ + ईचंद्रेश
३) वृद्ध्यादेश स्वर संधी

अ/आ + ए/ऐ → ऐ

पोटशब्दस्वरसंधी
एक + एकअ + एएकैक
सदा + एवआ + एसदैव
४) यणादेश स्वर संधी
पोटशब्दबदलसंधी
प्रति + अंतरइ + अ → य् + अप्रत्यंतर
स्थिती + अंतरई + अ → य् + अस्थित्यंतर
सु + अल्पउ + अ → व् + अस्वल्प
५) उर्वरित स्वर संधी
पोटशब्दबदलसंधी
नौ + इकऔ + इ = आव् + इनाविक

२. व्यंजन संधी

स्वर + व्यंजन किंवा व्यंजन + व्यंजन → व्यंजन संधी

१) प्रथम व्यंजन संधी
पोटशब्दसंधी
वाग् + चातुर्यवाक्चातुर्य
षड् + शास्त्रषट्शास्त्र
विपद् + कालविपत्काल
वाग् + पतिवाक्पति
क्षुध् + पिपासाक्षुत्पिपासा
२) तृतीय व्यंजन संधी
पोटशब्दसंधी
वाक् + ईशवागीश
वाक् + देवीवाग्देवी
सत् + आचारसदाचार
सत् + आनंदसदानंद
३) अनुनासिक संधी
पोटशब्दसंधी
जगत् + नाथजगन्नाथ
सत् + मार्गसन्मार्ग
षट् + मासषण्मास
४) त् ची विशेष संधी
  • सत् + चरित्र = सच्चरित्र
  • उत् + छेद = उच्छेद
  • सत् + जन = सज्जन
  • तत् + लीन = तल्लीन
  • सत् + शिष्य = सच्छिष्य
५) ‘म’ ची संधी
पोटशब्दसंधी
सम् + आचारसमाचार
सम् + गतीसंगती
सम् + क्रमणसंक्रमण

३. विसर्ग संधी

१) विसर्ग उकार संधी
  • यशः + धन = यशोधन
  • मनः + रथ = मनोरथ
  • तेजः + निधी = तेजोनिधी
२) विसर्ग र संधी
  • नि: + अंतर = निरंतर
  • बहि: + अंग = बहिरंग
  • बहि: + द्वार = बहिद्वार
३) विसर्ग घ संधी
  • दु: + चिन्ह = दुश्चिन्ह
  • मनः + ताप = मनस्ताप
  • अध: + तल = अधस्तल
४) विसर्ग स्थिर संधी
  • रज: + कण = रज:कण
  • अध: + पात = अध:पात
  • अंत: + पटल = अंत:पटल

संधी ओळखण्याचे नियम

  • स्वर + स्वर = स्वर संधी
  • व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी
  • विसर्ग असल्यास → विसर्ग संधी
  • "विग्रह" केल्यास संधी स्पष्ट होते
  • उच्चार सुलभ करण्यासाठी संधी होते

Practice Questions (MCQ)

1. “राम + आला” या शब्दांचा योग्य संधी रूप कोणते?

2. “सत् + जन” या शब्दांचा योग्य संधी रूप कोणते?

3. विसर्ग संधी कोणत्या उदाहरणात आहे?

📢 आमच्या MahaGovStudy समुदायात सहभागी व्हा!

मोफत नोट्स, महत्त्वाचे अपडेट्स, Practice Questions आणि Mock Tests – हे सर्व मिळवा WhatsApp आणि Telegram वर!